

Swargate subway shops remain locked, creating safety concerns.
Sakal
स्वारगेट : सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील मोठ्या पादचारी भुयारी मार्गाची दुरवस्था झाली होती. तसेच, तो कुलुपबंद अवस्थेत होता. सकाळने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मात्र, पालिका प्रशासनाकडून याची दखल घेत हा भुयारी मार्ग सुरु करत साफसफाई करण्यात आली. मात्र, मार्गातील दुकाने अद्यापही कुलुपबंद अवस्थेत असल्याने भुयारी मार्ग पुन्हा असामाजिक कृतींचे अड्डे बनू लागला आहे. मार्ग वापरणाऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने आता एक पाऊल पुढे टाकत ही दुकाने सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.