इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम

इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम
Published on

MGV26B16126

फेरतपासणीत स्वर्णश्री पाटीलला १०० टक्के गुण
मंगळवेढा, ता. २२ : येथील इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनी स्वर्णश्री धनंजय पाटील हिने दहावी बोर्ड परीक्षेच्या फेरतपासणीत ५०० पैकी ५०० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला होता. त्यात स्वर्णश्रीला ४९९ गुण (९९.८० टक्के) मिळाले होते. मात्र, पूर्ण गुण मिळतील, या आत्मविश्वासातून प्राचार्य रवींद्र काशीद व विषय शिक्षकांनी समाजशास्त्र विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. त्यानंतर झालेल्या फेरतपासणीत तिला एक गुण वाढून समाजशास्त्रात १०० पैकी १०० गुण मिळाले. त्यामुळे तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० झाले असून ती राज्यात प्रथम आल्याचे बोर्डाने पत्राद्वारे कळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com