esakal | चाकणकरांना बदलून स्वाती पोकळेंच्या हाती राष्ट्रवादीची धुरा
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणकरांना बदलून स्वाती पोकळेंच्या हाती राष्ट्रवादीची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. शहरात आक्रमकपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी महिला संघटनेच्या रूपाली चाकणकर यांच्याऐवजी स्वाती पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवती संघटनेच्या शहराध्यक्षा मनाली भिलारे यांच्याकडील जबाबदारी कमी करण्यात आली आहे.

चाकणकरांना बदलून स्वाती पोकळेंच्या हाती राष्ट्रवादीची धुरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. शहरात आक्रमकपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी महिला संघटनेच्या रूपाली चाकणकर यांच्याऐवजी स्वाती पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवती संघटनेच्या शहराध्यक्षा मनाली भिलारे यांच्याकडील जबाबदारी कमी करण्यात आली आहे.

या संघटनाच्या अध्यक्षांच्या आजपासून नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली. पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्याचे तुपे यांनी म्हटले आहे.

या नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना त्याच्या विभागाच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये  प्रमोशन देण्यात आले आहे. तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये बढती देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवरती पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल, असे तुपे यांनी म्हटले आहे. 

नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे

राष्ट्रवादी महिला काँग्रेस-  स्वाती पोकळे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस - महेश हांडे

राष्ट्रवादी विद्यार्थी- विशाल मोरे

राष्ट्रवादी युवती काँग्रेस- अश्विनी परेरा

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस- अजीम गुडाकुवाला

राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल- राजेंद्र कोंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल- समीर निकम

राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल- प्रमोद रणवरे

राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल- ययाती चरवड

राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल- शंकर शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल- सुकेश पासलकर

loading image