Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

पुणे महापालिकेच्या सेवेत झाडणकाम करण्यासाठी सुमारे साडेपाच हजार कर्मचारी आहेत.
pune city Sweeping Increased Roads Cleaned Garbage Dumps Reduced

pune city Sweeping Increased Roads Cleaned Garbage Dumps Reduced

sakal

Updated on: 

पुणे - शहरातील रस्ते, सार्वजनिक जागा झाडण्यासाठी महापालिकेने झाडणकामाचे नवीन धोरण तयार करून त्यानुसार सर्व जबाबदारी ठेकेदारावर टाकण्यात आली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजार ७०० ने वाढविण्यात आली. यामुळे शहरातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. रोज रस्ते झाडल्याने कचऱ्याचे प्रमाण थेट २०० टनाने वाढले आहे. शिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी दिसणारे उकिरड्यांचे (क्रोनिक स्पॉट) प्रमाण कमालीचे घटल्याने शहराच्या स्वच्छतेत वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com