Sweet Corn Prices : मार्केट यार्डात स्वीट कॉर्नचा जोरदार हंगाम सुरू; प्रतिकिलो दर १८ रुपयांपर्यंत
Pune News : राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे स्वीट कॉर्नसाठी मागणी वाढून दर १२ ते १८ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
मार्केट यार्ड : सध्या राज्यभर पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील पर्यटनस्थळे गजबजलेली आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसह हैदराबाद, अहमदाबाद आदी ठिकाणांहून स्वीट कॉर्नला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.