Custerd Apple : मार्केट यार्डात सीताफळाचा गोडवा महागला

बाजारातील सीताफळाची आवक निम्म्याहून अधिक घटली असून, दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी कायम आहे.
Custerd Apple

Custerd Apple

sakal

Updated on

मार्केट यार्ड - बाजारातील सीताफळाची आवक निम्म्याहून अधिक घटली असून, दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी कायम आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत सीताफळाच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर्जा आणि आकारानुसार प्रतिकिलो २० ते १३० रुपये भाव मिळत आहे. गणेशोत्सवात मागणी आणखी वाढण्याची शक्यता असून, त्या तुलनेत आवक न वाढल्यास भाव पुन्हा वधारतील, असा अंदाज व्यापारी माउली आंबेकर यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com