महापालिकेकडून "प्रतिकात्मक' बांबू दिन 

Dilip2.JPG
Dilip2.JPG


पुणे (येरवडा) ः: पाषाण व सुतारवाडी येथील रोपवाटिकेत एक कोटी रुपयांचे साडेनऊ हजार बांबूची रोपे ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण पावसाळा संपत आला, तरी या रोपांची लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता. 18) या "जागतिक बांबू दिनानिमित्त पुणे महापालिका उद्यान विभाग, नगररस्ता (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व बांबूच्या रोपांची लागवड करण्यासाठी आग्रही असलेल्या लोकप्रतिनिधींनी कोठेही वाच्यता न करता "प्रतिकात्मक' बांबू दिन साजरा केला. 

पाषाण व सुतारवाडी येथील रोपवाटिकेत बेली, पेंटेड, ब्ल्यू लाइन, व्हेरिगेटेड, जायंट ग्रीन, मल्टिफ्लेक्‍स व्हेरिगेटेड या विदेशी बांबूपासून ते देशी बांबूची रोपे पडून आहेत. बांबू दिनाची तरी किमान आठवण ठेवून लागवड करतील, अशी अपेक्षा होती. गेली सहा महिने रोपवाटिकेत पावसाच्या पाण्यावर ते तग धरून होते. त्यांचे पालकत्व स्वीकारणारे लोकप्रतिनिधी, त्यांचा सांभाळ करणाऱ्या माळ्यांपासून ते उद्यान विभाग व नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जागतिक बांबू दिनाला मौनव्रत धारण करीत हजेरी लावली. कोणीही भाषण केले नाही, पुरावा ठेवायचा नसल्यामुळे सेल्फी तर अजिबात घेतले नाही. त्यानंतर पुढील पावसाळ्यापर्यंत झाडे जिवंत राहिली, तर शहरात विविध ठिकाणी रोपे लागवड करण्याचा या वेळी संकल्प करून उपस्थितांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. 

---------------------------

साडेनऊ हजार बांबूच्या रोपांपैकी एक हजार रोपांची लागवड खराडीतील नियोजित पित्ती उद्यानात केली आहे. उर्वरित रोपांची लागवड टप्प्या-टप्प्याने लवकरच करणार आहोत. 
- शशिकांत बांबळे, सहायक उद्यान अधीक्षक, महापालिका 

---------------------------------

महापालिकेच्या उद्यान विभागातील वृक्ष प्राधिकरण समितीवर राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लागते. यावर नियमाप्रमाणे पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची निवड केली पाहिजे, तरच शहराच्या पर्यावरणाचा विचार होऊ शकतो. - समीर निकम, पर्यावरणप्रेमी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com