esakal | लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना घरी पाठविण्यासाठी यंत्रणा लागली कामाला; पहिल्या दिवशी झाली तब्बल...
sakal

बोलून बातमी शोधा

Labour

परराज्यातील नागरीकांसह राज्यातील विविध जिल्हामध्ये जाणाऱ्या नागरिकांनी ही सोमवारी पोलिसांकडे नोंदणी केली. त्यामध्ये 583 जणांचा समावेश आहे. त्यापैकी 138 व्यक्तिना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिच्या अंत्यसंस्कारास जाण्यासाठी तर 256 व्यक्तिना तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जायचे होते, अशा व्यक्तिचा समवेश आहे.

लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना घरी पाठविण्यासाठी यंत्रणा लागली कामाला; पहिल्या दिवशी झाली तब्बल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - संचारबंदीमुळे शहरात अडकून पडलेल्या कामगारांसह अन्य लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी यंत्रणा उभी केली असून सोमवारी पहिल्याच दिवशी 15 हजार 500 जणांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील नागरीकांची संख्या सर्वाधिक असून त्यांचा गावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संचारबंदीमुळे मागील दिड महिन्यापासून शहरात राज्यातील व परराज्यातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले होते. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर रविवारी गावी जाणाऱ्या नागरिकांना परवानगी देण्याची व त्यांच्या नोंदणीपासून ते गावी जाण्यासाठी आवश्यक वाहन व्यवस्था पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकन्यात आली होती. त्यानुसार सोमवारी सकाळपासून ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात केली. तसेच अनेक नागरिकांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील "मायग्रंट सेल'द्वारे नोंदणी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारी दिवसभर कामगारानी नोंदणी केल्यानंतर सायंकाळी पहिली यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये 15 हजार 502 नागरिकांचा समावेश असणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 4 हजार 48, त्यानंतर आणि बिहार येथील 3 हजार 810 नागरिकांची सर्वाधिक संख्या असल्याचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले.

आंध्र प्रदेश - 10, अरूणाचल प्रदेश - 25, आसाम - 43, बिहार - 3 हजार 810, छत्तीसगड - 1 हजार 186, दिल्ली - 2, हिमाचल प्रदेश - 12, जम्मू-काश्मिर - 20, झारखंड - 1 हजार 301, कर्नाटक -1 हजार 199, मध्यप्रदेश - 1 हजार 46, ओडीसा - 203, राजस्थान - 392, तमिलनाडू - 173, उत्तरप्रदेश - 4 हजार 48, उत्तराखंड - 563, पश्चिम बंगाल - 1 हजार 469 असे एकुण 17 राज्यातील 15 हजार 500 नागरिकांची नोंदणी झाली.

अशा येत होत्या अडचणी
* नोंदणी कुठे व कशी करावी याबाबत संभ्रम
* ऑनलाईन नोंदणी करण्यास अडचणी
* वैद्यकीय प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे मिळविण्यासाठी दिवसभर वणवण
* ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे झेरोक्ससाठी जादा पैशाची आकारणी
* शहर व उपनगरमधील मजुर अड्डा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी
* गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की, शिविगाळ. गैरप्रकार करणाऱ्याना पोलिसांकडुन समज.