बोरी खुर्दमध्ये तागाच्या उत्पादनाचा प्रयोग

बोरी खुर्दमध्ये तागाच्या उत्पादनाचा प्रयोग
Published on: 

आळेफाटा, ता. ६ : बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथील शेतकरी संपत गणपत चिंचवडे यांनी तागाच्या पिकाचा व्यावसायिक प्रयोग केला आहे. हिरवळीच्या खतापुरते मर्यादित न राहता, चार एकर क्षेत्रावर तागाची लागवड करून त्यांनी नगदी पिकाचा नवा पर्याय समोर ठेवला आहे.
तागाचा उपयोग प्रामुख्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. मात्र, पश्चिम बंगालच्या धर्तीवर चिंचवडे यांनी बियाणे आणि तंतू निर्मितीच्या उद्देशाने हा प्रयोग केला. सध्या तागाला प्रति किलो १३० ते १५० रुपये दर मिळत असून, एकरी १२ क्विंटल उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे.
या प्रयोगासाठी त्यांना एकरी साधारण ६ ते साडेसहा हजार रुपये खर्च आला आहे. यात बियाणे, पेरणी, निंदणी आणि हार्वेस्टरद्वारे काढणीचा समावेश आहे. चार एकरातून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास चिंचवडे यांनी व्यक्त केला. जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच आर्थिक स्थैर्य मिळवणे हा या प्रयोगाचा मुख्य उद्देश असल्याचे चिंचवडे यांनी सांगितले. योग्य बाजारपेठ मिळाल्यास हा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो.

उत्पादन आणि बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळाल्यास परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही या पिकाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हा या प्रयोगामागील उद्देश आहे.
- संपत चिंचवडे, ताग उत्पादक

08882

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com