esakal | एमआयएमच्या नेत्यांवर कारवाई करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

बोलून बातमी शोधा

take action on Leaders of MIM says Vishwa Hindu Parishad

एमआयएमच्या नेत्यांवर कारवाई करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी, वारिस पठाण यांसारख्या नेत्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून त्यांच्याकडून समाजात द्वेष पसरविला जात आहे. मुस्लीम समाजाने त्यांचे नेतृत्व बाजूला सरकविले पाहिजे. अन्यथा त्याने मुस्लीम समाजाचेच नुकसान होईल. या प्रकरणी केंद्र व राज्य सरकारांनी स्वतःहून पाऊले उचलत ठोस कारवाई करावी'', अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत परांडे यांनी वरील मागणी केली. विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र देवी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, विभाग मंत्री नितीन वाटकर यावेळी उपस्थित होते. 

परांडे म्हणाले, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने (सीएए) देशातील कोणत्याही व्यक्तीचा नागरिकत्वाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही. मात्र, या कायद्याविरुद्ध हेतूपुरस्सर अपप्रचार केला जात आहे. हिंदू आणि राष्ट्रविरोधी भूमिका घेत हिंसक आंदोलने केली जात आहेत, अशा शक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जावी. सर्वोच्च न्यायालयाने केवळ राममंदिराच्या उभारणीसाठी न्यास स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये, मशीद उभारण्यासाठी न्यास स्थापण्याचे उल्लेख नाही. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर सरकारी निधीमधून नव्हे तर भाविकांच्या लोकवर्गणीमधून उभे राहील.''