उन्हाळ्यात अशी घ्या वाहनाची काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vehicle

सध्याचा उन्हाळा अधिक कडक आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांची काळजी घेणे गरजेचे असून ते सुस्थितीत ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे.

उन्हाळ्यात अशी घ्या वाहनाची काळजी

पुणे - सध्याचा उन्हाळा (Summer) अधिक कडक आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांची काळजी (Vehicle Care) घेणे गरजेचे असून ते सुस्थितीत ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास अपघाताच्या घटना घडतात. सध्या ई-बाइकला लागलेल्या आगींचे वृत्त अनेक ठिकाणी ऐकावयास मिळते आहे. यामध्ये जिवाला धोका निर्माण होण्यासह वाहनाचेही नुकसान होते. वाहनाची कशी काळजी घ्यावी हे पाहू या.

 • टायर सुस्थितीत ठेवा, रस्त्यावरील उष्णता व वाहनाचा वेग यामुळे ते गरम होतात.

 • कुलंटची काळजी घ्या. ते इंजिन थंड ठेवण्यास मदत करते.

 • उन्हात वाहन उभे करताना काचा पूर्ण बंद करू नका. हवा खेळती राहिल्यास आत गरम होत नाही.

 • ऑइलची पातळी वेळोवेळी तपासा

 • उन्हाळ्यात पेट्रोल टाकी पूर्ण भरू नका

 • वाळलेले गवत, पालापाचोळा आदी ठिकाणी वाहन उभे करू नका

 • बॅटरीच्या वायरिंगवर वाढत्या तापमानाचा परिणाम होत असतो, त्यामुळे त्याची तपासणी करावी.

 • चालत्या वाहनात सीएनजी, डिझेल अथवा पेट्रोलचा वास येत असल्यास वाहन बाजूला घेऊन तपासणी करा.

 • उच्च दाबाच्या विजेच्या तारांखाली वाहन उभे करू नये.

 • वाहनात बसण्यापूर्वी पाच ते दहा मिनीट दरवाजा उघडा ठेवावा.

 • काचेचे वायपर वर करून ठेवा, जेणेकरून रबर खराब होणार नाहीत

 • पेट्रोल टाकीचे झाकण काही वेळासाठी उघडून त्यामध्ये जमा झालेली हवा बाहेर जावू द्यावी

 • वेग प्रमाणातच असावा.

 • सावलीतच वाहन उभे करण्यास प्राधान्य द्यावे. अन्यथा रंग उडतो, काचा तडकतात.

टॅग्स :VehiclesummerTemperature