पावसाळ्यात ज्येष्ठ, गर्भवती, मुलांची काळजी घ्या; फ्ल्यूबरोबरच कोरोनाची धास्ती   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात ज्येष्ठ, गर्भवती, मुलांची काळजी घ्या; फ्ल्यूबरोबरच कोरोनाची धास्ती  

पावसाळ्यात दिसणारे आणि काही दिवसांमध्ये स्वतःहून बरे होणारे हे आजार आता कोरोनाची स्पष्ट लक्षणे आहेत.त्यामुळे इतर पावसाळ्यापेक्षा हा पावसाळा वेगळा ठरणार आहे,असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टे केले.

पावसाळ्यात ज्येष्ठ, गर्भवती, मुलांची काळजी घ्या; फ्ल्यूबरोबरच कोरोनाची धास्ती  

पुणे- पावसाळ्याची सुरवात आणि कोरोनाचा उद्रेक या मुळे येत्या आठवडा लहान मुले, गर्भवती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची कसोटी पहाणारा ठरेल. त्यामुळे पावसाळ्यातील आजारापासून काळजी घेण्याबरोबरच कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरवर्षी पुणेकरांसाठी आनंददायी असणारा पावसाळा यंदा कोरोना विषाणूंच्या साथीच्या उद्रेकामुळे तणावाचा ठरत आहे. पावसाळ्यात तापमानात सतत बदल होतात. हवेतील आद्रता वाढलेली असते. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशातून सहज होणाऱया जंतूनाशाला मर्यादा येतात. माणसाची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे सर्दी आणि खोकल्याचे विषाणू सहज डोकेवर काढतात. एन्फ्लूएन्झा प्रकारचा म्हणजे फ्ल्यूचा ताप येणारा विषाणू आतापर्यंत आपल्याकडे सर्रास आढळत होता. बरोबर अकरा वर्षांपूर्वी स्वाइन फ्ल्यूची त्यात भर पडली. त्याच बरोबर आता उद्रेक झालेल्या कोरोना या नवीन विषाणूंची धास्ती वाढली आहे. या विषाणूंचा संसर्ग लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांना जास्त होताना दिसून येते. त्यामुळे ज्येष्ठ, गर्भवती आणि मधुमेह, कर्करोग अशा इतर आजारांच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पावसाळ्यात दम लागणे, ताप, सर्दी, खोकला सहज होतो. पावसात भिजल्याने, दूषित पाणी, बाहेरील अन्नपदार्थ खाण्यात आल्याने, वातावरणात झालेल्या बदलांचा हा परिणाम असतो. यंदा मात्र, पावसाळ्यात सहजासहजी दिसणारे आणि काही दिवसांमध्ये स्वतःहून बरे होणारे हे आजार आता कोरोनाची स्पष्ट लक्षणे आहेत. त्यामुळे इतर पावसाळ्यापेक्षा हा पावसाळा वेगळा ठरणार आहे, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टे केले. 

ही काळजी घ्या 

- कामाशिवाय घरबाहेर पडू नका 
- घराबाहेर पडताना मास्क वापरा 
- वारंवार हात स्वच्छ धुवा 
- गर्दीत जाऊ नका 
- सोशल डिस्टसिंग पाळा 
- सर्दी, ताप, खोकला लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या 

पावसाळ्यात ताप नेमका कशामुळे आलाय, याचे निदान करण्याचे मोठे आव्हान रहाणार आहे. हा ताप हवा बदलामुळे आहे, सामान्य फ्लू आहे, स्वाइन फ्लू आहे की, कोरोना आहे, याचे अचूक निदान करून त्या आधारावर उपचार करावे लागणार आहेत. सध्या कोरोनाचा उद्रेक असल्याने प्राधान्याने कोरोना संसर्गाची चाचणी करावी. कारण, लवकर निदान झाल्यास प्रभावी उपचारातून रुग्ण खडखडीत बरा होऊ शकतो. 
- डॉ. सचिन गांधी