Take care while Going into go to the village on Diwali holiday
Take care while Going into go to the village on Diwali holiday

दिवाळीच्या सुट्टीला गावाला जाताय? वाचा महत्त्वाची बातमी

Published on

पुणे  : दिवाळीची सुट्टी सुरू होत असल्याने अनेकजण गावाला जातात. बंद घरे फोडून चोऱ्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा पोलिसांच्या वतीने गावाला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. 

शहर व परिसरात अनेकजण विविध जिह्यातील लोक येथे नोकरी व्यवसायानिमित्ताने राहतात. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकजण गावी जात असतात. अशी बंद हेरून चोरटे घरातील किंमती ऐवज लुटून नेतात. त्या रोखण्यासाठी दरवर्षी पोलिस नागरिकांना मौल्यवान वस्तूचे रक्षण कसे करावे. याबाबत मार्गदर्शन करीत असतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अशी घ्या बाहेरगावी जाताना काळजी :
-बाहेरगावी जाताना असल्यास घरातील पैसे बँकेत ठेवा. दागिने लॉकरमध्ये ठेवा. 

-बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नका.

-आपण जात असल्याची माहिती शेजाऱ्यांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी.

-बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये.

-प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ/पिऊ नयेत.
त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते.

-प्रवासात अनोळखी व्यक्ती महिला, पुरुषांपासून सावध रहावे 

-गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पाकीट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे.

-व्यापारी, दुकानदार, सराफा यांनी ही या काळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो. त्यामुळे दुकानाबाहेर रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी. CCTV कॅमेरे लावावेत

-कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वानी प्रवासा दरम्यान तोंडाला मास्क लावावा तसेच सँनिटायझरचा वारंवार वापर करावा.

-दीपावली सणानिमित्त बाजारामध्ये खरेदी करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे.

''मौल्यवान व किंमती ऐवज बँकेत लॉकर मध्ये रोख रक्कम बँकेत ठेवा. यंदा कोरोनाची पार्श्वभूमी आहे. त्याची दुसरी लाट ही डिसेंबर, जानेवारी दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराने त्रास होऊ शकतो. म्हणूनप्रदूषण करणारे फटाके वाजवू नयेत. बाहेर जाताना मास्क वापरावेत, सामाजिक अंतर पाळा, शुभेच्छा देताना हात मिळवू नयेत. नमस्कार करून शुभेच्छा द्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे वाक्य लक्षात ठेवा.''
- पौर्णिमा गायकवाड, पोलिस उपायुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com