esakal | 'पुणे जिल्ह्यातील ग्रामसभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्या'
sakal

बोलून बातमी शोधा

'पुणे जिल्ह्यातील ग्रामसभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्या'

गावोगावच्या ग्रामसभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे आदेश पारित करावेत.'' अशी मागणी युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

'पुणे जिल्ह्यातील ग्रामसभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्या'

sakal_logo
By
डी. के. वळसे-पाटील

मंचर : ''पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी होणाऱ्या ग्रामसभा घेण्यास मुदतवाढ देण्यात यावी किंवा सहकार विभाग घेत असलेल्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या धर्तीवर गावोगावच्या ग्रामसभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे आदेश पारित करावेत.'' अशी मागणी युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सार्वजनिक कार्यक्रमांना होणारी गर्दी व सोशल डिस्टन्सचे योग्य पालन होत नसल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने वाढतो आहे. गावोगावच्या विकास कामांसाठी ग्रामसभा घेणे गरजेचे आहे. पण कोरोनामुळे वर्षभर संपूर्ण राज्यात ग्रामसभा घेण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने गावांच्या विकासाचा राजमार्ग थांबला होता. नुकतेच पुणे जिल्हा परिषदेने पंचायत समिती कार्यालयामार्फत "आमचा गाव, आमचा विकास" ह्या धोरणानुसार गावांचे विकास आराखडे मंजूर करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणूका करून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामसभा घेण्याबाबत आदेश पारित केले आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्ह्यात एक हजार 400 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत. ग्रामसभेत गर्दी वाढल्यास कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे सदर ग्रामसभा घेण्यास काही आठवडे मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे. मुदतवाढ मिळणे अशक्य असल्यास ग्रामसभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्यास कोरोना नियमांची पायमल्ली होणार नाही.नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहचणार नाही. असे बांगर यांनी  निवेदनात नमूद केले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top