टाकळी हाजी - सांस्कृतीक भवन लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी - स्वातंत्रदिनाचा विजय असो..., जय जवान जय किसान, गार हिरवे गार...झाडे लावा चार अशा घोषणा देत प्रभातफेरी, भाषणे, सांस्कृतीक कार्यक्रम, कवायत साजरी करत शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात 72 वा स्वातंत्रदीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

टाकळी हाजी - स्वातंत्रदिनाचा विजय असो..., जय जवान जय किसान, गार हिरवे गार...झाडे लावा चार अशा घोषणा देत प्रभातफेरी, भाषणे, सांस्कृतीक कार्यक्रम, कवायत साजरी करत शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात 72 वा स्वातंत्रदीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथे राष्ट्रपती पारीतोषीक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी बाबाजान तांबोळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बॅण्ड पथकाबरोबर स्वातंत्रदिनाचा जयघोष करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. माजी जिल्हा परीषद सदस्य व माजी उपसभापती कै. भाऊसाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ शिंदे परीवाराकडून सांस्कृतीक भवनाचा लोकार्पण सोहळा झाला. याचे उदघाटन माजी सरपंच वंदना पुंडे व माजी विद्याधाम हायस्कूलचे अध्यक्ष सदाशिव पुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बबनराव शिंदे, मनोज शिंदे, संतोष शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सविंदणे ( ता. शिरूर ) येथे सरपंच वंसत पडवळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम साजरा केला. भैरवनाथ मंदिरासमोर जेष्ट नागरीकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली. त्याचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे सरपंच दीपक रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परीषद शाळेने सवाद्य गावातून प्रभातफेरी काढली होती. आमदाबाद ( ता. शिरूर ) येथे सरपंच योगेश थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. 

Web Title: Takli Haji - Cultural Building Opening