

फुलवडे, ता. १३ ः तळेघर (ता. आंबेगाव) येथील ग्रामीण रुग्णालय दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असल्याने दिवसभर सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी जन आरोग्य समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून या पुढे दर गुरुवारी ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी विभाग दिवसभर सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तळेघर हे आदिवासी भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील गावांमधील नागरिकांची दर गुरुवारी आठवडे बाजाराच्या निमित्ताने येथे मोठी गर्दी होते. यापूर्वी गुरुवारी बाह्यरुग्ण तपासणी विभाग (ओपीडी) सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी ४ व सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू असे. यामुळे दुपारनंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेअभावी उपचार मिळणे अशक्य होत होते, बरेच नागरिक दुपारनंतर दवाखान्यात येत असल्याने त्यांना ४ वाजेपर्यंत थांबावे लागत होते.
स्थानिक नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन ओपीडीची वेळ बदलण्याची मागणी जन आरोग्य समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने सातत्याने केली जात होती. अखेर ही मागणी मान्य झाली असून यापुढे दर गुरुवारी ग्रामीण रुग्णालय पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
“दर गुरुवारी बाह्यरुग्ण तपासणी विभाग वेळ सकाळी ९:०० ते दुपारी २:०० व दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० अशी पूर्ण वेळ राहणार आहे. मात्र इतर दिवशी रुग्णालयाची ओपीडी शासकीय नियमांनुसार सकाळी ९ ते १, व दुपारी ४ ते ६ पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.”
-डॉ. राहुल जोशी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय तळेघर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.