
Talathi Bribery Scandal
Sakal
पुणे : शहरालगतच्या प्रस्तावित रिंगरोडमध्ये अधिग्रहीत जमिनीचा सातबारा आणि आठ ‘अ’ उताराच्या प्रतीसाठी लाच मागितल्याप्रकरणी तीन महिला तलाठ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.