तळबीडच्या शिवारातील विहीरीत मृतदेह आढळला

तळबीडच्या शिवारातील विहीरीत मृतदेह आढळला

Published on

तळबीडला विहिरीत
आढळला मृतदेह

मतदान कार्डावरून पटली ओळख


उंब्रज, ता. २७ : तळबीड (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत दोनदरा नावच्या शिवारातील विहिरीत अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. विहिरीच्या काठावर शर्टामध्ये असलेल्या मतदान कार्डमुळे संबंधित मृतदेहाची ओळख पटवण्यात तळबीड पोलिसांना यश आले. आज दुपारी अडीचच्या सुमारास घटना उघडकीस आली. योगराज भानुदास बुगडेरा (रा. हनुमान मंदिर हलादा, जि. चंद्रपूर असे मृताचे नाव आहे.

याबाबत विशाल अजित मोहिते (वय ३३, रा. तळबीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास दोनदरा नावच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी ते चालत निघाले हाेते. त्यावेळी रस्त्यात त्यांना उत्तमराव माधवराव मोहिते यांच्या विहिरीच्या बाजूला चप्पल पडलेली दिसली. त्यांनी विहिरीत पाहिले असता पुरुषाचा अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर विहिरीच्या वरच्या बाजूस पांढऱ्या रंगाचा शर्ट पडला होता. त्या शर्टामध्ये मतदान कार्ड सापडले. त्यावर योगराज भानुदास बुगडे (रा. हनुमान मंदिर हलादा, ता. बह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे लिहिले हाेते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी ताे पाठवला.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com