Pune : तालचक्र महोत्सव शनिवारपासून रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालचक्र महोत्सव शनिवारपासून रंगणार
तालचक्र महोत्सव शनिवारपासून रंगणार

तालचक्र महोत्सव शनिवारपासून रंगणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंडित विजय घाटे निर्मित ‘तालचक्र’ हा तालवाद्य महोत्सव येत्या २७ व २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. यात रसिकांना हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य वाद्यांच्या सादरीकरणाबरोबरच गायन आणि नृत्याचाही आनंद घेता येणार आहे.महोत्सवाची सुरवात शनिवारी लोकप्रिय तालवादक नीलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या महाराष्ट्रातील लोकसंगीतावर आधारित ‘महाराष्ट्र फॉल्क’ या कार्यक्रमाने होणार असून सत्राच्या उत्तरार्धात पंडित विजय घाटे, विद्वान सेल्वागणेश व शीतल कोलवलकर यांनी साकारलेला व मिलिंद कुलकर्णी आणि सुरंजन खंडाळकर यांच्या साथीने सादर होणारा ‘मेलोडिक रिदम’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी सायंकाळी ५ वाजल्यपासून पंडित नयन घोष यांचे चिरंजीव ईशान घोष, उ. तौफिक कुरेशी यांचे सुपुत्र शिखरनाद कुरेशी व योगेश शम्सी यांचे सुपुत्र श्रावण शम्सी या त्रयींचा तालवाद्य सहवादनाचा बहारदार कार्यक्रम पुण्यात पहिल्यांदाच रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला मेहताब अली नियाझी यांच्या सितार वादनाची साथ असेल.

तर दुसऱ्या सत्रामध्ये लोकप्रिय गायिका विदुषी कौशिकी चक्रवर्ती, जीनो बॅंक्स, शेल्डन डिसिल्वा, ओजस अढिया, सारंगीवादक मुराद अली व अतुल रनिंगा यांनी एकत्रित साकारलेला ‘फ्युजन २०२१’ या पहिल्यांदाच सादर होत असलेल्या अनोख्या संगीत आविष्काराचा आस्वाद पुणेकरांना मिळणार आहे.

loading image
go to top