Pune News: अजितदादांचा फोन आणि तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे काम मार्गी ; तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाच्या कामासाठी स्व. अजित पवार यांचा मोठा पाठपुरावा

Ajit Pawar's Inspection Speeds Up Proposal: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पाला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी आणि पाठपुराव्यानंतर गती मिळाल्याचा दावा.
Pune News

Pune News

esakal

Updated on

हरिदास कड

चाकण: गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर मोठी वाहतूक वाढली. कंपन्यांची अवजड वाहनांची वाहतूक तसेच इतर वाहतूक वाढली. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची पाहणी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली. वाहतूक कोंडीची ठिकाणे पाहिली आणि तळेगाव चौकात गेल्या वर्षी आठ जुलैला सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास वाहतूक कोंडीची पाहणी केली ही पाहणी सकाळी दहा पर्यंत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com