Pune News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; ५९ कोटींचा निधी मंजूर

औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या आणि दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी) मार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या लवकरच मार्गी लागणार.
talegaon Chakan Traffic Jam

talegaon Chakan Traffic Jam

esakal

Updated on

पुणे - औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या आणि दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी) मार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. पावसामुळे दुरवस्था झालेल्या या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाची उघडीप मिळताच युद्धपातळीवर काम सुरू करून ४० किलोमीटरचा रस्ता अवघ्या दोन दिवसांत, तर एमआयडीसी हद्दीतील अतिखराब १४ किलोमीटरचा रस्ता चार दिवसांत दुरुस्त करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com