

Pune News
sakal
पुणे : तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास गावकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता, या लोहमार्गाचे फेरसर्वेक्षण करून बदलता येईल का, याबाबत सात नोव्हेंबरला रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.