Talegaon Fire Accident : तळेगाव ढमढेरे येथे गॅस पाईप लाईन फुटल्याने आगीचा भडका

सुमारे ४५ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश
talegaon dhamdhere gas pipe line burst fire accident fire brigade pune
talegaon dhamdhere gas pipe line burst fire accident fire brigade puneSakal

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे - सणसवाडी ( ता. शिरूर) येथील शेणाचा मळा रस्त्यावर आज दुपारच्या दरम्यान टोरंट कंपनीच्या गॅसची पाइपलाईन फूटल्याने गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला आणि परिसरात उंच आगीचा डोम ( ज्वाळा) उसळला.

स्फोट झाल्याबरोबर स्थानिक नागरिकांनी रस्त्याकडे धाव घेतली. शेजारी मोठी लोकवस्ती व औद्योगिक वसाहत असल्याने नागरिक घाबरून गेले. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग,

अमोल चव्हाण, अमोल नलगे, विकास मोरे, उद्धव भालेराव तसेच कंपनीचे अधिकारी आणि सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा दरेकर, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, आरपीआयचे तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुमारे ४५ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. जेथे आगीचा डोम उसळला ( ज्वाळा) तेथे शेजारी लग्नकार्य असल्यामुळे घराबाहेर मंडप लावला होता. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी लोकवस्ती असून, या रस्त्याने औद्योगिक कामगार, शेतमजूर व वाहनांची मोठी रहदारी असते.

आग आटोक्यात आल्याने शेजारील परिसरात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पाईपलाईनच्या गळतीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सणसवाडी आणि तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत प्रशासनाने सदर कंपनीच्या गॅस गळतीची व स्फोटाची चौकशी करून गॅस वाहिनीबद्दलची नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com