Pune : आमदारांची सतर्कता आणि प्रशासनाची तत्परता, वाहतूक सुरळीत

नदीवरील पीएमआरडीए च्या रस्त्यावरील पूलाचा भरावा प्रशासनाने त्वरित दुरुस्त केला
Pune
Pune sakal
Summary

नदीवरील पीएमआरडीए च्या रस्त्यावरील पूलाचा भरावा प्रशासनाने त्वरित दुरुस्त केला

तळेगाव ढमढेरे : आमदार ऍड. अशोक पवार यांच्या सतर्कतेमुळे आणि प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वेळ नदीवरील पीएमआरडीए च्या रस्त्यावरील पूलाचा भरावा प्रशासनाने त्वरित दुरुस्त केला. अतिवृष्टीमुळे येथील पुलावरील भरावा वाहून गेला होता. त्यामुळे नगरहून कासारी फाटा मार्गे पीएमआरडीएच्या रस्त्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक तीन दिवस बंद होती.

आमदार अशोक पवार यांना समजताच तत्परता दाखवून तातडीने तळेगाव ढमढेरे येथे येऊन पूलाची पाहणी केली आणि तेथूनच जिल्हाधिकारी व पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून पूलाचा भरावा वाहून गेल्याची माहिती दिली. तातडीने येथील भरावा दुरुस्त करून शिक्रापूरकडे जाणारी वाहनांची गर्दी कासारी फाटा मार्गे बाह्य वळणाने तळेगाव ढमढेरे मार्गे एल अँड टी फाटा मार्गे पाठवावी अशी सूचना केली.

प्रशासनाने त्वरित तत्परता दाखवून वेळ नदीवरील वाहून गेलेल्या भराव्याची दुरुस्ती केली. त्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवून वाहून गेलेला पुलावरील सर्व भरावा तीन ते चार तासात जेसीबीच्या साह्याने ठेकेदाराकडून दुरुस्त केला आणि शुक्रवारी सायंकाळी उशिरा नगरहून पुण्याकडे जाणारी वाहने कासारी फाटा मार्गे तळेगाव ढमढेरे येथे वळविण्यात आली. त्यामुळे शिक्रापूर येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीस थोडाफार दिलासा मिळाला.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीवरील पीएमआरडीए च्या रस्त्यावर नवीन पुलाची अत्यंत व तातडीची गरज असून पुलापासून राहिलेला पीएमआरडीए चा अपूर्ण रस्ता त्वरित पूर्ण करावा अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. येथील रस्त्यावर वेळ नदीत पक्का पुल झाल्यानंतर वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही.

शिक्रापूर येथे नगरहून पुण्याकडे जाणारी वाहने काही अंशी का होईना कासारी फाटा मार्गे पीएमआरडीए च्या रस्त्याने तळेगाव ढमढेरे व एल अँड टी फाटाकडे पुण्याला जाऊ शकतील आणि शिक्रापूर येथील वाहतूक कोंडीचा ताण कमी होईल अशी अपेक्षा आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली. येथील वेळ नदीवरील नवीन पूल त्वरित करावा तसेच राहिलेला अपूर्ण रस्ता पूर्ण करावा अशी आग्रही मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे व पीएमआरडीएच्या प्रशासनाकडे आमदार अशोक पवार यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com