

A record 3,400 goats and sheep arrived at the Mahatma Phule sub-market in Talegaon Dhamdhere, Shirur, with strong demand during the Ashadh season driving brisk trade.
Sakal
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उप बाजारात सुमारे ३४०० शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्रमी आवक झाली असून, बाजारभावही चांगला मिळाला आहे. आषाढ महिन्यामुळे बोकड व मेंढ्यांना मोठी मागणी होती. आजच्या बाजारात सुमारे ५०० कोंबड्यांची विक्री झाली. येथील बाजारात वाहनांच्या पार्किंगसह शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी बाजार समितीतर्फे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती प्रशासक हरिश्चंद्र कांबळे, सचिव अनिल ढोकले, सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितली.