

जय बजरंग गणेशोत्सव मंडळ, तळेगाव ढमढेरे
स्थापना - १९६३
अध्यक्ष - तन्मय घुमे
उपाध्यक्ष - सोहम भांडे, ऋतुराज घुमे व यश घुमे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) गावच्या वेशीसमोर हनुमान मंदिरामध्ये जय बजरंग गणेशोत्सव मंडळाचा गणपती विराजमान होतो. मंडळाच्या गणपतीची मूर्ती आकर्षक असून मूर्तीच्या डाव्या बाजूला सोंड आहे. सिंहासनावर विराजमान झालेल्या गणपतीसाठी १४ किलो चांदी वापरण्यात आली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक आवर्जून गर्दी करतात. मंडळातर्फे दरवर्षी समाज प्रबोधनपर देखावा सादर केला जातो. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.
मंडळातर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या काळात नागरिकांसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. संकष्ट चतुर्थीनिमित्त भजन, कीर्तन, विद्युत रोषणाई, माझा गणराया माझा अभिमान आदी उपक्रम राबविण्यात येतात. शिक्रापूर पोलिस ठाण्यातर्फे जय बजरंग गणेशोत्सव मंडळाला पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
या वर्षी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना एकत्र करून गणेशोत्सवानिमित्त विविध विधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
- नागनाथ शिंगाडे, तळेगाव ढमढेरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.