सासू-सासऱ्यांना जावयाकडून तळेगाव ढमढेरे येथे मारहाण

सासू-सासऱ्यांना जावयाकडून 
तळेगाव ढमढेरे येथे मारहाण
Published on

शिक्रापूर, ता. ५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे कौटुंबिक वादातून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासू-सासऱ्यांना जावयाने त्याच्या साथीदारांसह लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात जावयासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथील चिमणापीर मळा परिसरात अभिजित भुजबळ याचा त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी सासू मीना पांडुरंग खेडेकर (वय ५०, रा. राहू, ता. दौंड) आणि सासरे जावयाच्या घरी आले होते. या वेळी चर्चा सुरू असताना अभिजित भुजबळ, सुभाष दत्तात्रय भुजबळ, उमेश जगताप आणि नवनाथ विधाते यांनी सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली, तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. या घटनेनंतर मीना खेडेकर यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अभिजित भुजबळ व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com