तळेगाव एमआयडीसीतील कचऱ्याचे ढीग अखेर हटवले

तळेगाव एमआयडीसीतील कचऱ्याचे ढीग अखेर हटवले
Published on

तळेगाव स्टेशन, ता.२६ : नवलाख उंबरे ग्रामपंचायतीने कचरा डेपोची जागा बदल्यानंतर अखेर एमआयडीसी प्रशासनाने देखील तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर साचलेले ढीग हटविले. त्यामुळे आजूबाजूच्या कंपनीमधील कामगार आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. ‘तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक १ मधील तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर नवलाख उंबरे ग्रामपंचायत हद्दीतील काही व्यावसायिक, हॉटेलचालक कचरा आणून रिचवत होते. मध्यवर्ती साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे औद्योगिक क्षेत्राचे विद्रुपीकरण होण्यासोबतच आजूबाजूच्या कंपनीनामधील कामगार, कर्मचारी आणि समोरच असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. त्याचीच दाखल घेत एमआयडीसी प्रशासनाने इथे साचलेले अनेक टन कचऱ्याचे ढीग उचलून त्याची विल्हेवाट लावली. ‘सकाळ’ने वृत्ताच्या माध्यमातून हा प्रश्न मांडून सोडवणूक केल्याबद्दल कंपनीमधील कामगार आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी आभार मानले. यापुढे तळेगाव औद्योगिक वसाहतीत कुठल्याही प्रकराचा कचरा टाकल्यास कडक कारवी करण्यात येणार असल्याचा इशारा तळेगाव एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड यांनी दिला आहे. या ठिकाणी लावलेली बंद वाहने हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com