चोरी प्रकरणातील फरार ट्रकचालकाला ९ वर्षांनी अटक

चोरी प्रकरणातील फरार ट्रकचालकाला ९ वर्षांनी अटक
Published on

तळेगाव स्टेशन, ता. ६ : ट्रकसह त्यामधील लोखंडी कॉइलची चोरी करण्यात आली होती. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल होता. या आरोपीला तब्बल ९ वर्षांनी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
सचिन संभाजी गरवारे (४२, पार्ले, ता. कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अनंत रावण आणि पोलिस शिपाई भीमराव खिलारे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला कराड येथून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस अटक करुन वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com