

कार्यकारी अधिकारीपदी
गुणवंत कामगारांची निवड
सातारा, ता. १६ : जिल्ह्यातील गुणवंत कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने २०२५ मधील नमूद तरतुदींना अनुसरून केलेल्या लेखी पत्रव्यवहारास व पाठपुराव्याच्या अनुषंगाने राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, कार्याध्यक्ष गजानन घाडगे व विभागीय सदस्य शंकरराव मांढरे यांच्या सातत्यपूर्वक पाठपुराव्याद्वारे संजय गिरी, चंद्रकांत लोहार, प्रजय राऊत, संजय पवार, विठ्ठल तांबे, महेंद्र धनवे व आनंदा पाटील आदी कामगारांना जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते व तहसीलदार वैभव पिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व शिक्के प्रदान करण्यात आले. यावेळी महसूल सहाय्यक नितीन मतकर व दीपक गुरव उपस्थित होते. कार्यक्रमास गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे संस्थापक दिलीपराव चरेगावकर, गोपाळराव खजुरे यांची उपस्थिती होती.
PNE26W34872
सातारा : राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांसमवेत संतोष पाटील.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.