भन्नाट !  सोशल मीडियावर तळजाईचा ट्रेंड 

 रीना महामुनी-पतंगे 
रविवार, 7 एप्रिल 2019

धनकवडी (पुणे) : तळजाई टेकडीवर जाऊन प्रशांत शिरोळेने "स्टायलिश' पोझ देत अनेक फोटो शूट केले अन्‌ फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि काही वेळातच लाइक्‍स आणि कमेंट्‌सचा वर्षाव होऊ लागला. प्रोफेशनल आणि हौशी फोटोग्राफरकडून तळजाई टेकडीवर वेगवेगळ्या अँगलचे फोटो शूट करून त्यातील निवडक फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा नवा ट्रेंड सध्या तळजाई टेकडीवर रूढ होताना दिसत आहे. 

धनकवडी(पुणे) : तळजाई टेकडीवर जाऊन प्रशांत शिरोळेने "स्टायलिश' पोझ देत अनेक फोटो शूट केले अन्‌ फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि काही वेळातच लाइक्‍स आणि कमेंट्‌सचा वर्षाव होऊ लागला. प्रोफेशनल आणि हौशी फोटोग्राफरकडून तळजाई टेकडीवर वेगवेगळ्या अँगलचे फोटो शूट करून त्यातील निवडक फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा नवा ट्रेंड सध्या तळजाई टेकडीवर रूढ होताना दिसत आहे. 

तळजाई, पर्वतीवर भन्नाट वातावरणात प्रोफेशनल आणि हौशी फोटोग्राफर तरुणांचे फोटो शूट करताना दिसत आहेत. शहराचे नंदनवन अशी ओळख असलेली तळजाई टेकडी फक्त वॉकिंग, जिम, जॉंगिग आणि पर्यटनापुरती राहिली नाही, तर टेकडी तरुणाईसाठी फोटोशूट पॉइंट ठरत आहे.

फोटोग्राफर वेगवेगळ्या स्टाइल आणि थीमनुसार फोटो शूट करून ते तेथेच तरुणांना देतात. फोटोग्राफर अक्षय गलांडे म्हणाला, "तळजाई टेकडीवर वेगवेगळ्या स्टाइलचे फोटो शूट करून घेण्यासाठी तरुणाईची चांगलीच मागणी असते. त्यामध्ये थीमनुसार, ड्रेस कोड, सीमिलर अशा प्रकारे फोटो शूट करून देतो. सध्या टिक-टॉक व्हिडिओसाठी तरुणाईची मागणी अधिक आहे. मी स्क्रिप्ट आणि गाणे ठरवून देतो आणि मग फोटो काढले जातात. अशा प्रकारे फोटोग्राफी करणारे पुण्यात अंदाजे तीन ते चार हजार फोटोग्राफर आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणांवर फोटो शूट करतात. वीकेंडला असे फोटो शूट करून घेतात. फोटो शूटनंतर लगेच फोटो सोशल मीडियावर शेयर केले जातात. या क्रेझमुळे लोकेश फोटोग्राफरासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. आपले फोटो सुंदर निघावेत आणि लाइक्‍स मिळाव्यात, यासाठी नवनव्या ठिकाणांना पसंती दिली जात आहे.'' 

दर्शन दिघे म्हणाला, "मला तळजाई टेकडीवरचे वातावरण आणि तेथे विकसित झालेले रस्ते आणि टेकडी चढताना येणारी मज्जा मला फोटोत कैद करून फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम, हाइक आणि ट्‌विटवर अपलोड करायचे होती. त्यामुळे मी वेगवेगळ्या पोझमधले फोटो शूट करून घेतले. मी नेहमी वेगवेगळ्या अँगलचे फोटो शूट करून घेतो.' 

 

Web Title: Taljai trends on social Media