Tamasha Booking : तमाशापंढरीत तब्बल तीन कोटी रुपयांची उलाढाल; नारायणगावात पाडव्याच्या मुहूर्तावर ३२ फडमालकांचे सुमारे दीडशे करार

नारायणगाव येथील विठाबाई नारायणगावकर तमाशापंढरीत पाडव्याच्या मुहूर्तावर ३२ फडमालकांचे सुमारे दीडशे करार झाले.
narayangaon Tamasha Booking

narayangaon Tamasha Booking

sakal

Updated on

नारायणगाव - येथील विठाबाई नारायणगावकर तमाशापंढरीत पाडव्याच्या मुहूर्तावर ३२ फडमालकांचे सुमारे दीडशे करार झाले. या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. मागील दीड महिन्यात आजअखेर एकूण सुमारे सहाशे करार झाले. तमाशा कार्यक्रमांतून सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या वर्षी तमाशाचे करार एक लाख रुपये ते साडेचार लाख रुपयांच्या दरम्यान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com