पौड - मे महिन्याच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यात निसर्गसौंदर्याला बहर आला आहे. हिरव्यागार डोंगरदऱ्या, नागमोडी वळणे, फेसाळणारे धबधबे आणि धुक्यात लपलेले रस्ते पाहण्यासाठी पर्यटकांची पावले मुळशीकडे वळू लागली आहेत. कोकणाचे प्रवेशद्वार असलेला ताम्हिणी घाट पर्यटकांनी फुलून गेला आहे. कुरकुरीत भजी, गरमागरम चहा आणि दाणेदार मक्याच्या कणसावर पर्यटक ताव मारताना दिसत आहेत.