

Accident
sakal
शिवणे - शिवणे, कोंढवे धावडे, कोपरे आणि उत्तमनगर परिसरात मोलमजुरी करून संसार उभा करणाऱ्या कुटुंबातील ही तरुण पिढी १२ वी नंतरचे शिक्षण अर्धवट सोडून मेहनतीने छोट्या व्यवसायाची सुरुवात करणारी. कष्टानं मिळालेल्या पैशातून क्षणभर विश्रांतीसाठी ते कोकणात फेरफटका मारायला निघाले; मात्र काळानेच घाला घालला. आई-वडील व भावंडांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आयुष्यात घेतलेली भरारी अर्धवटच राहिली.