
लोहगाव - घरापुढे घातलेला मांडव, रात्री उशीरापर्यंत चाललेली हळद नवरदेवासह घरातील सर्वांचीच चालू असलेली लगबग ही होती संगिता जाधव यांच्या घरातील लगीनघाई. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विवाहसोहळा. शुक्रवार (ता २०) रोजी पुण्याहून महाड येथे लग्नसोहळ्या करिता चाललेल्या वऱ्हाडातील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसचा अपघात झाला.