शिक्षण माणसाला निर्भय बनवित असल्याने महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी मोठे काम केले - काॅम्रेड तानाजी ठोंबरे

शिक्षण माणसाला निर्भय बनवित असल्याने महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी मोठे काम केले - काॅम्रेड तानाजी ठोंबरे
Published on

TMB26B04105
टेंभुर्णी : माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत विचार मांडताना कॉम्रेड तानाजी ठोंबरे.

शिक्षणानेच माणसाला निर्भय बनवले : कॉ. ठोंबरे
टेंभुर्णीत कर्मयोगी व्याख्यानमालेत महात्मा फुलेंचा शेतकरी विषयावर मार्गदर्शन

टेंभुर्णी, ता. ८ ः शिक्षण हे माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याचे काम करते, हक्कांची जाणीव करून देते आणि निर्भय बनवते; अशी शिक्षणाची खरी व्याख्या महात्मा जोतीराव फुले यांनी केली होती. त्या काळातील शेतकऱ्यांचे शोषण हे केवळ अज्ञानामुळेच होत असल्याचा ठाम निष्कर्ष काढून महात्मा फुले यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी शेतकरी व कष्टकऱ्यांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले, असे प्रतिपादन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी केले.

टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुलेंचा शेतकरी या विषयावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयमामा शिंदे होते.
कॉम्रेड ठोंबरे म्हणाले, मानवी जीवन हे संघर्षमय असून, ''संघर्ष'' हा जीवनातील सर्वात सुंदर शब्द आहे. अपयशाने खचून न जाता प्रत्येकाने संघर्षासाठी सज्ज राहिले पाहिजे. महात्मा फुले यांच्या मते हा देश शेतकरी, कष्टकरी आणि शोषितांचा आहे. त्यामुळे देशातील राजकारण हे केवळ या घटकांच्या हितासाठीच चालले पाहिजे. दुर्दैवाने आजही शेतकऱ्यांची स्थिती फारशी बदललेली नसून, शेतकरी स्वतः पिकवलेल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकत नाही, हे आजचे कटू वास्तव आहे.
कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, परमेश्वर खरात, सचिन होदाडे, नागेश खटके, सचिन पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com