कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्कार

कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्कार
Published on

कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव
नांदेड येथील विद्रोही संमेलनामध्‍ये होणार सन्मान
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २७ : नांदेड येथे होणाऱ्या २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये बार्शीचे कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. २७ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी हे संमेलन नांदेड येथे होत आहे.
प्रा. ठोंबरे हे २०२५ मध्ये सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन केले होते. २०१५ मध्ये बार्शीत झालेल्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी महात्मा फुले यांची शैक्षणिक भूमिका, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकरांचे साहित्य विचार, शाहीर अमर शेख, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य, कॉम्रेड ए.बी. बर्धन अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. मार्क्स-फुले -आंबेडकरवादी विद्रोही विचाराने दलित , कामगार , शेतकरी, विद्यार्थी, युवकांच्या चळवळीमध्ये त्यांनी काम केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
नांदेड येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत, उद्‍घाटक बजरंग तिवारी, स्वागताध्यक्ष राहुल प्रधान, मिलिंद आव्हाड, त्याचप्रमाणे विद्रोही साहित्य संस्कृती सभेच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर धमाले यांच्या उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.

फोटो : कॉ. तानाजी ठोंबरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com