

मांडवगण फराटा, ता. १६ : तांदळी (ता. शिरूर) येथे वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने शेतातील दीड एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी दत्तात्रेय निवृत्ती गदादे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गदादे यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. मंगळवारी दुपारी वाऱ्यामुळे तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या. त्यामुळे उसाच्या पिकाने पेट घेतला. शेजारील शेतकरी मनोज कळसकर यांच्या निदर्शनास आग येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ती वेगात पसरली. घटनेची माहिती दिल्यानंतर पोपट गदादे, रोहित खोरे, सौरभ गदादे, आबा गदादे, धनंजय गदादे, नवनाथ गदादे, गोरख गदादे, रोहिदास गदादे, नंदू खोरे व तुषार गदादे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत दीड एकर क्षेत्रातील ऊस काही वेळातच जळून खाक झाला. हाताशी आलेले ऊसपीक आगीत नष्ट झाल्याने गदादे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, बुधवारी (ता. १६) महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.
दरम्यान, महावितरणने केलेल्या पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी दत्तात्रेय गदादे यांनी केली आहे.
03632
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.