तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाउंडेशनतर्फे इंग्लिश स्पीकींगची कार्यशाळा

दत्ता म्हसकर
मंगळवार, 20 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाऊंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी इंग्लिश संभाषण कार्यशाळेचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण, नगरसेविका अंकिता गोसावी, समीना शेख, सुवर्णा बनकर, सना मन्सूरी, बारव ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बुट्टे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. 

प्रास्ताविक व स्वागत तनिष्का गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी केले. प्रत्येक व्यक्ती इंग्लिश कसे बोलू शकते याचे रहस्य व स्वतःची प्रगती स्वतः कशी करू शकते याचे सखोल मार्गदर्शन  अमोल कापसे यांनी केले. या कार्यशाळेत नाविन्यपूर्ण व  मनोरंजनात्मक मेडिटेशन, समुहचर्चा, स्टेज डेरींग, स्मरणशक्ती, मुलाखतीचे टेकनीक, अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यासाठी वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. प्रशिक्षण कार्यशाळेस 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. यासाठी 9860848922 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पुनम तांबे, वैष्णवी चतुर, रेश्मा कापसे, अंजली दिवेकर, कविता छाजेड, उर्मिला थोरवे, छाया वाळुंज,  स्वप्नजा मोरे, सरिता कलढोणे  तनिष्का सदस्या तसेच महिला व तरुणी उपस्थित होत्या. सूत्रसंचलन मयुर मिरे यांनी केले आभार  सुवर्णा ढोबळे यांनी मानले. 

Web Title: tanishka and tejparva foundation organised spoken english for women