दोन मुलींच्या अपघातातील पसार टँकर चालकास कसे पकडले?; वाचा सविस्तर

Crime-Scene
Crime-Scene
Updated on

वडगाव शेरी - गॅस वाहतुकीच्या टँकरचा धक्का लागून प्राण गमावलेल्या दोन मुलींच्या अपघाताला कारणीभूत ठरवून पसार झालेल्या टँकर चालकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयित आरोपी महादेव गोविंद सावंत (वय 60, रा. नवी सांगवी, पुणे) या टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.

मध्य पुण्यात रेसिडेन्सी क्लब चौकात रविवारी (ता 7) रात्री साडेनऊ वाजता टँकरचा धक्का लागून झालेल्या अपघातात रेहनाज रिजवान शेख (वय 16, रा. म्हाडा कॉलनी विमाननगर ) आणि उम्मेहानी सोहेल शेख ( वय 1, रा कॅम्प, पुणे)  अशा दोन मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता. 

याप्रकरणी रुखसार रिजवान शेख ( वय 24, रा विमाननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी टँकर चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा टँकर कुरकुंभ वरून भोसरीला जात असताना अपघात झाला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
crime
Potholes Emerge at Several Spots on Ashtavinayak Highway
Tehsildar Dr. Sachin Wagh
Marathi News Esakal
www.esakal.com