

Black Magic
sakal
वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यामध्ये भोंदू बाबा ,साधू, तथाकथित देवऋषी, तांत्रिक आणि मांत्रिक यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक व अंधश्रद्धा आर्थिक शोषण होण्याच्या घटना घडत आहेत. मात्र याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी येत नाहीत. नागरिकांनी अशा काही घटना घडल्यास पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी यावे असे आवाहन वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.