जैन मुनी प्रवचन

जैन मुनी प्रवचन
Published on

PNE26W46369
सोलापूर : ‘‘८४ लक्ष योनींमधून प्रवास केल्यानंतर मिळालेला मनुष्य जन्म भाग्यवान आहे. तप करण्याचे सामर्थ्य केवळ मानवाला लाभले आहे. तपश्चर्येमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, मन प्रसन्न राहते आणि संकल्पशक्ती दृढ होते. उपवास हा केवळ आहाराचा त्याग नसून तपश्चर्येचा भाग आहे. मुलांना लहानपणापासून जप, तप व उपवासाचे संस्कार द्यावेत. युवकांनी धर्म-ध्यान, संतसंग व धर्मस्थानांच्या दर्शनाकडे वळावे,’’ असे प्रतिपादन परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांनी केले.
--------------------------
PNE26W46370 -
पापमुक्तीसाठी सद्गुरूंची संगत सर्वोत्तम
सोलापूर : ‘‘संसार पापांनी भरलेला असून, आत्म्याचे पतन करणारी पापाची निमित्ते पावलोपावली उपलब्ध आहेत. त्यामुळे संस्कारी युवक-युवतीही चुकीच्या प्रवाहात वाहून जात असून, मैत्रीच्या नावाखाली विविध पापे त्यांच्या जीवनात प्रवेश करत आहेत. युवा पिढीच्या संस्कारांच्या सुरक्षेसाठी सद्गुरूंची संगत हाच सर्वोत्तम उपाय आहे,’’ असे प्रतिपादन मुनिश्री प्रशांतरत्न विजयजी यांनी केले.
जोडभावी पेठ येथील श्री आदेश्वर जैन श्वेतांबर मंदिरात सुरू असलेल्या दैनिक प्रवचनात ते बोलत होते. सद्गुरूंच्या संगतीने व्यसनाधीन व पापी व्यक्तीच्याही जीवनात अद्भुत परिवर्तन घडू शकते. असफल सफल, निर्बल बलवान आणि पापी पावन बनतो, असे त्यांनी सांगितले.मुलांच्या आधुनिक शिक्षणासाठी पालक ट्युशन-क्लासेसची काळजी घेतात; मात्र संस्कारांचे काय, असा प्रश्न उपस्थित करून प्रत्येक पालकाने मुलांना सद्गुरूंची संगत मिळवून द्यावी. कलियुगात सद्गुरूंची संगतच योग्य मार्ग दाखविणारी पथदर्शक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com