
अश्विनी पवार
पिंपरी : कोणत्याही उपनगराचा विकास करताना रस्ते, भूमिगत गटारे, पदपथ, पथदिवे, पाणी, वीज या पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. मात्र, ताथवडेमध्ये या सर्वांचीच वानवा आहे. अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. भूमिगत गटारांच्या अभावामुळे येथील भुयारी मार्गात कायमच पाणी वाहून येते.