esakal | तावशी-नीरा नरसिंहपूर रस्त्यासाठी ९३ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

road.jpg

इंदापूर तालुक्यातील तावशी ते  नीरा-नरसिंहपूर रस्त्याच्या कामासाठी  ९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

तावशी-नीरा नरसिंहपूर रस्त्यासाठी ९३ कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील तावशी ते  नीरा-नरसिंहपूर रस्त्याच्या कामासाठी  ९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर  रस्त्यामधील इंदापूर तालुक्यातील तावशी ते नीरा-नरसिंपूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याला निधी मिळत नसल्यामुळे काम रखडले होते. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. बीकेबीएन रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले होते. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करुन या रस्त्यासाठी कामासाठी ९३ कोटी रुपयांचा भरघोस निधी खेचून आणला आहे.

तावशी पासून नीरा-नरसिंगपूरपर्यंत ३९ कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम हायब्रिड अॅन्युईटी कार्यक्रम योजनेतंर्गत करण्यात येणार आहे.सध्या रस्त्याची रुंदी साडेपाच मिटर असून यामध्ये वाढ करुन ती सात मिटर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, तावशी उद्धट, जांब, कुरवली, चिखली, कळंब, निमसाखर, निरवांगी, रेडणी, लाखेवाडी, बावडा, गणेशवाडी ते नरसिंहपूर या गावातील नागरिकांचे दळणवळण सोईस्कर होणार आहे.तसेच माळशिरस व बारामती तालुक्यातील प्रवाशांना रस्त्याचे फायदा होणार आहे.

जिल्हात इंदापूरसाठी सर्वाधिक ९०० कोटींचा  निधी - भरणे
इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी पाच वर्षामध्ये प्रयत्न केले. तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा अनुशेष भरुन काढला आहे. रस्त्यांची कामे झाल्याने दळणवळण सोईस्कर होवून विकासाला हातभार लागणार आहे.विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील जिल्हामध्ये इंदापूर तालुक्यासाठी  सर्वाधिक ९०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.
 

loading image
go to top