सहा व साडेसात मीटर रूंदीच्या रस्त्यावरही आता टीडीआर वापरता येणार!

सहा व साडेसात मीटर रूंदीच्या रस्त्यावरही आता टीडीआर वापरता येणार!

पुणे : संजय पाटील (नाव बदलले आहे)...आपल्या दोन भावांसह गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ कोथरूडमध्ये राहतात. त्यांचा वडिलोपार्जित छोटा बंगला आहे. कुटुंब मोठे झाले आहे. त्यांना तो पाडून पार्किंग आणि तिन्ही भावांसाठी प्रत्येकी एक मजला असे बांधायचे आहे. परंतु बंगल्यापुढील रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे वाढीव बांधकाम करता येत नाही. 

कर्वेनगर येथे एक चाळीस वर्ष जुनी सोसायटी आहे. सोसायटीमध्ये शंभर फ्लॅट आहेत. सोसायटीचा पुनर्विकास करावयाचा आहे. त्यामुळे सभासदांना सध्या असलेल्या जागेपेक्षा वीस टक्के जादा हवे क्षेत्र आहे. पण कोणीही विकसक पुढे येण्यास तयार नाहीत. कारण सोसायटीपुढील रस्ता नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचा आहे. त्यामुळे टीडीआर वापरता येत नाही. परिणामी सोसायटीचा विकास रखडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील निम्मा भागाचा विकास कायद्यातील त्रुटीमुळे रखडला आहे. त्यातून महापालिकेचा देखील महसूल बुडत आहे. पण आता मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सहा मीटर व साडेसात मीटर रुंदीचे असलेले सुमारे 103 किलोमीटर लांबीचे 323 रस्ते 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीचे करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर मांडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2016 मध्ये राज्य सरकारने नव्याने टीडीआर लागू केले. त्यामध्ये कमीत कमी नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्याच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचे बंधन महापालिकेवर घातले. त्यातून हा प्रश्‍न निर्माण झाला होता. पुणे शहरात नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांची संख्या ही जवळपास साठ ते सत्तर टक्के आहे. या सर्व ठिकाणच्या इमारती, वाडे, जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकासाला त्यामुळे खो बसला होता. जुन्या हद्दीचा नव्याने विकास आराखडा तयार चूक दुरुस्तीचा प्रयत्न महापालिकेकडून झाला. परंतु तत्कालीन राज्य सरकारने ते हाणून पाडला होता. त्यामुळे काही लाख लोकसंख्या नियमातील या त्रुटीमुळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत अडकून पडली आहे. त्यांना आता महापालिकेकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून ते नऊ मीटरपर्यंत करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर शहरातील काही हजार बांधकामांना याचा फायदा मिळणार आहे. त्यातून महापालिकेचे उत्पन्न देखील मिळणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविड-19 मुळे बांधकाम क्षेत्राला मरगळ आली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर देखील झाला आहे. या क्षेत्राला पुन्हा संजीवनी देण्यासाठी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. शहरातील सहा ते नऊ मीटर रुंदीच्या आतील सुमारे 323 रस्त्यांचे आणि 103 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 210 कलमाखाली या रस्त्यांची रूंदी वाढविण्यास मान्यता देण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे. त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या रस्त्यांवर टीडीआर आणि प्रिमिअम एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे. 

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी नाही. त्यामुळे अनेक जुन्या इमारती, जुने वाडे, सोसायट्यांचा विकास रखडला आहे. अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. अशा इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागावा, तसेच महापालिकेचे उत्पन्न देखील वाढावे, या हेतूने प्रशासनाकडून 210 कलमाखाली या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाने सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com