पुण्यात विद्यार्थीनीला अश्‍लिल मेसेज पाठविणाऱ्या शिक्षकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठवून तिला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षकास बेड्या ठोकल्या. 

पुणे : घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठवून तिला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षकास बेड्या ठोकल्या. 

संदीप कुमार ( वय 35, रा. पोरवाल रस्ता, लोहगाव, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी पालकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पिडीत विद्यार्थीनी सध्या बीसीएचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपुर्वी ती बारावीला असताना तिला भौतिकशास्त्र हा विषय शिकविण्यासाठी तिच्या पालकांनी अभियंता असलेल्या संदीप कुमार या शिक्षकास निवडले होते. त्यानुसार, तो घरी येऊन विद्यार्थीनीस भौतिकशास्त्र विषय शिकवित होता. दरम्यान, त्याने विद्यार्थीनीशी जवळीक साधून तिला लग्नाची मागणी घातली होती. अनेक दिवस शिक्षकाकडून विद्यार्थीनीस त्रास दिला जात होता. अखेर या प्रकारास कंटाळून विद्यार्थीनीने आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्याची हकालपट्टी केली. दरम्यान एप्रिल महिन्यापासून त्याने विद्यार्थीनीसह तिच्या पालकांच्या मोबाईलवर अश्‍लिल मेसेज पाठविण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

पानटपरी चालकाच्या मोबाईवरुन पाठविले मेसेज 
आरोपीने संदीप कुमार याने आपण पोलिसांना सापडू नये, यासाठी त्याच्या घराजवळील एका पानटपरी चालकाशी ओळख वाढविली. पानटपरी चालकाचा मोबाईल घेऊन त्याद्वारे तो विद्यार्थीनी व तिच्या पालकांना मेसेज पाठवित होता. दरम्यान, पानटपरीचालकास त्याचा संशय आला. त्याने याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher arrested for sending obscene messages to girl student in Pune