Teacher Recruitment Process Shifted to MSCE
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी यांसारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक व पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येत आहे, असा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. परंतु, शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.