रांजणगाव सांडसमध्ये विविध कामांची पाहणी

रांजणगाव सांडसमध्ये 
विविध कामांची पाहणी
Published on

आंधळगाव, ता. १९ : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे येत्या १५ दिवसांत भरली जातील, तसेच दोन दिवसांत विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत मॉडेल स्कूलच्या कामांची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्या दीपाली गव्हाणे यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. या वेळी पाटील यांनी वर्गखोल्या, शैक्षणिक सुविधा आणि उपक्रमांची पाहणी करून शिक्षकांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘शिरूर तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा राज्यभर आहे. हे सातत्य राखण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेमार्फत ऑल इंडिया रेडिओच्या सहकार्याने शैक्षणिक कार्यक्रम राबवण्याचे नियोजन असून शाळांना सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील.’’
या दौऱ्यात पाटील यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि अंगणवाडीलाही भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. दीपाली गव्हाणे यांनी तळेगाव-रांजणगाव गटात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्याचा मानस व्यक्त केला. रांजणगाव शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या वेळी ग्रामस्थांनी संगणक लॅब आणि इमारत दुरुस्तीची मागणी केली. गटविकास अधिकारी महेश डोके, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सरपंच प्रदीपा रणदिवे, ग्रामसेवक नीलेश लोंढे, मुख्याध्यापक हिरामण शेलार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. अमोल काळभोर यांनी सूत्रसंचालन केले, तर योगेश कोळपे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com