
पुणे : राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत ‘मुलाखतीसह’ पदभरतीमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक यांच्या आठ हजार ५५६ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी, इयत्ता अकरावी ते बारावी, अध्यापक विद्यालये या गटातील पदभरतीची ही यादी शालेय शिक्षण विभागाने ‘पवित्र’ पोर्टलमार्फत जाहीर केली आहे.