जनगणनेतील अडचणींबाबत शिक्षक संघाकडून निवेदन

जनगणनेतील अडचणींबाबत
शिक्षक संघाकडून निवेदन
Published on: 

वडगाव मावळ, ता. १८ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांची भेट घेऊन जनगणनेच्या कामात शिक्षकांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे, सहसचिव दत्तात्रय भालेराव, तालुका सरचिटणीस तथा
शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश चांदोरकर, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुमित नळे आदी पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक प्रगणकाला २०० कुटुंब किंवा ८०० व्यक्ती यापेक्षा जास्त कुटुंब व संख्या देण्यात येऊ नये अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. पहिल्या टप्प्यात अनेक शिक्षक बंधू-भगिनींना ५०० पेक्षा जास्त कुटुंब, तर काही काहींना ८०० ते हजार कुटुंबापर्यंत गणना करावी लागली. त्यामुळे शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. कामाच्या अतिरिक्त बोजामुळे अनेक शिक्षक आजारी पडल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाकडील कुटुंब व व्यक्ती संख्या कमी करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
नायब तहसीलदार तळेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन वरिष्ठांपर्यंत ती पोहोचविण्याचे व मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.